२२ डिसेंबरला अंतिम यादी; तांत्रिक त्रुटींबाबत राज्यभरातून तक्रारी

Foto
साजवार्ता
Page No.: 3
Date: 21/11/2026
पडताळणी
एसआयआरमधून वगळलेल्या ६ लाख मतदारांची फेरतपासणी
१५ डिसेंबरपर्यंत निर्णय घेणार
छत्रपती संभाजीनगर (सांजवार्ता ब्युरो): निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेत अनुपस्थित, स्थलांतरित, मृत आणि दुबार अशा चार प्रवर्गातील मतदारांची नावे यादीतून
या प्रक्रियेसाठी गणना प्रपत्र तयार करणे आणि मुद्रित करण्याचे काम १८ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण केले जाणार आहे. १८ ते ३० नोव्हेंबरदरम्यान प्रपत्रांचे वितरण व संकलन होईल. त्यानंतर प्राप्त प्रपत्रांची छाननी करून १५ डिसेंबरपर्यंत निर्णय घेतला जाणार आहे. अखेर २२ डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
वगळण्यात आली आहेत. मात्र, जिवंत असलेल्या मतदारांची नावे मृत म्हणून नोंदविण्यात आल्याच्या तसेच अन्य तांत्रिक त्रुटींबाबत राज्यभरातून तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर वगळण्यात आलेल्या मतदारांची पुन्हा पडताळणी
(रिव्हेरिफिकेशन) करण्याचा निर्णय निवडणूक विभागाने घेतला आहे. यासंदर्भात राज्याचे अवर सचिव तथा उपमुख्य निवडणूक अधिकारी प्रशांत नावगे यांनी आदेश जारी केले आहेत. जिल्ह्यात एसआयआर प्रक्रियेदरम्यान चार प्रवर्गांतून ६ लाख ८ हजार ४००
मतदार वगळण्यात आले आहेत. आता या सर्व मतदारांच्या नोंदींची फेरतपासणी केली जाणार आहे. त्यामुळे चुकीच्या नोंदी किंवा तांत्रिक त्रुटींमुळे मतदार यादीबाहेर गेलेल्या नागरिकांना पुन्हा संधी मिळणार आहे. याबाबत निवडणूक विभागाच्या उपजिल्हाधिकारी सविता चौधर यांनी सांगितले की, काही ठिकाणी मतदार प्रत्यक्षात जिवंत असतानाही बूथस्तरीय अधिकाऱ्यांनी (बीएलओ) त्यांचा मृत्यू झाल्याचा अहवाल दिल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे फेरपडताळणीचा निर्णय घेण्यात आला आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions